लहान मुले आणि आई वडील/Lahan mul ani aaibaba

 आजकाल च्या धक्का धक्की च्या जीवनात लाजन मुलांचे बालपण हे धोक्यात आलेले आहे. ह्या लेख च्या माध्यमातून तुम्हाला समजेल, ह्या एका वाक्यात खूप मोठा रहस्य दडलेला आहे हे समजून घ्या 

आजच्या समाजामध्ये लहान मुलांवर खूप अन्याय होत आहे, आणि तो अन्याय ती लहान मुले सहन करत चालेले आहे , आपल्यावर अन्याय होत आहे , आपला संगोपन नोट होत नाही , अप्याला मैदान नाही खेळायला, आपल्याला , मित्र नाही , आपल्याला नीट आहार नाही, हे त्यांना कळत नाही किंवा कोणी सांगत ही नाही.

आणि हा अन्याय ते गपचुप सहन करतात, ह्या निरागस , गोंडस, निष्पाप , जीवाला ,का इतका अन्याय सहन करावा लागतो , कोण आहे जिम्मेदार, समाज, आई बाबा, धर्म, जात, गरिबी, भाषा , श्रीमंती, वाढते compition की आणखी काही. 

आजच्या ह्या युगात लहान मुलांचे जे शोषण होत आहे ह्या वर हा लेख आहे, 

मूळ जन्माला आला रे आला तेव्हापासून २ ते अडिज वर्षा पर्यंत त्याल स्वातंत्र्य असते, त्या नंतर त्याची कसरत ला सुरुवात होते, ती म्हणजे play group , नंतर नर्सरी आणि मग ज्युनियर केजी , सिनियर kg , गणवेश आणि पाठीवरती दफ्तर, घेवून लहान लेकरू चालला शाळेत, काय समजतो हो त्याला , त्या चार चौकडी मध्ये त्याला कोंडून ठेवलं जातं, आणि आपण म्हणतो मझ बाळ शिकायला गेला, त्याला शाळेची सवय लागायला हवी आधीच्या काळात , बालवाडी असत , छान छान गोष्टी, ती दगडी पाटी , किंवा पत्र्याची पाटी,  खडूची पेन्सिल, पिशवी, खेळायला मैदान, त्यात आई ने दिलेला डबा, कोणी डाळ  भात , कोणी साखर चपाती, कोणी तूप चपाती, कोणी गूळ चपाती, लाडू, चटणी चपाती, भाजी चपाती घेवून येत , आणि गणवेश तर नव्हताच, आणि आता, त्यांच्या डब्यात, पॅनकेक , waffle,ब्बन , ज्याम रोटी, त्याची जागा , ह्या डिजिटल स्कूल ने घेतली,  आणि नावे पण , लिटिल चॅम्प , किंडर जॉय, अश्या नावाने , बाळवडीचे ज्युनियर kg सिनियर kg school झाले, आणि त्यांचा बालपण compition मध्ये भाग घेयाला हताश झाला. पण शहरात आता कुठे बालवाडी दिसत नाही , चाळीमध्ये कुठे तरी असते बालवाडी , नाहीतर गावा गावात.  आणि आता  त्या आधुनिक स्कूल वाले , लहान मुलांना नवीन नवीन प्रोजेक्ट दिले जाते करायला, त्यांना काय समजतो हो प्रोजेक्ट बद्दल , नंतर आई बाबा कामावरून थकून आल्यावर करतात मग प्रोजेक्ट , नाहीतर शेजारी कोण असेल त्यांची मदत घेतात , म्हणजे तुम्ही समजू शकता की किती त्रास आहे ह्या पोरांना, 

कारण सध्या शाळांमध्ये पहिली लां मुलांचं नाव टाकायचं झाल की  ज्युनियर kg सिनियर kg झालेले मुलेच घेतात, कारण आत्ताच्या teacher लोकांना, रेडीमेड, म्हणजे तयार मुल पाहिजेत, म्हणजे त्यांना शिकवायला सोपे जाते. त्यातून पण त्यांना tution ला पाठवलं जातं, अजून काय हवं 

बालवाडी झाली, ज्युनियर kg सिनियर kg झाली 

आता नवीन  ट्रेण्ड आलंय day Care, म्हणजे तुम्ही सकाळी मुलांना कामाला जायचे वेळेला त्या day Care मध्ये सोडून जावा , आणि कामावरून आल्यावर त्यांना पीक अप करा , म्हणजे आई वडिलांना डे केयर मध्ये त्यांच्या पोरांची काळजी ही घेतली जाते आणि पोर  शिकतात ही, हे पैसे वाल्यांचे काम , त्यांची फी ही तेवढी महाग असते , कारण पोर संभलन म्हणजे खायचे काम नाही, कोण रडतंय , कोण खात नाही, कोणी शी च केलीय कोणी सुसू केलीय, कोण मस्ती करतोय , आणि काय माहित ही त्या पालकांना की त्या डे केयार मध्ये मुलांचं सांभाळ कास होतोय , 

पालकांनी त्या मुलांना पीक अप केला की घरी घेवून वापस त्या चार चौकडी मध्ये सोडून देतात , थकलेले पालक काय त्या मुलांना खेळायला घेवून जातील , की घरातले काम करतील , मग ती बिचारी मुल व्हिडिओ गेम ,  मोबाईल वर रमतात , आणि त्यांचे आई बाप कामात, मग अश्या पोरांना , नको नको त्या ॲलर्जी होतात , कोणाला टोमॅटो ची ॲलर्जी , कोण डाळ च खत नाही, कोण भाजी खत नाही , चपाती नको , मग त्यांना वेस्टर्न फूड दिले जाते , पॅनकेक , waffale , जॅम रोटी, पिझ्झा , न्युटेल्ला , नूडल्स , असा आहार सध्या ह्या मुलांचं होत चालला आहे .

 मी हॉटेल मध्ये काम करत असताना एका दोन वर्षाच्या मुलाला लॅक्टोज ची ॲलर्जी होती, म्हणजे दुधाची ॲलर्जी , येवढ्या लहान मुलांना दुधाची ॲलर्जी कशी काय असू शकते,

पण सध्याच्या युगात आई बाबा ची पोर सांभाळण्याची जागा एक तर डे केयर ने घेतली आणि दुसरी मेड ने घेतली , तीच लहान मुलांना सांभाळ करते,

आता फार कमी लोकांच्या घरात आजी असते , ती सांभाळते लहान मुलांना, नाहीतर आता आज्जी आजोबांना कोण जवळ ठेवतो, म्हणजे आई बाबांना , सर्वांना प्रायव्हसी हवी असते , अडीच माणसाच्या कुटुंबात ते खुश असतात . त्यांचा असा विचार असतो , आम्ही कामाला जाणार , पोर सांभाळणार , EMI भरणार की म्हातर्यांना सांभाळणार. पण हे सर्व ह्या आधुनिक यूगामुळे झालाय, तुम्हाला काय वाटते.

आमच्या एका शेजारी नि आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचा शिक्षण मिळाव ह्या हेतूने , इंग्लिश मिडीयम मध्ये टाकला , पण झाला उलटाच पोरगा cocktail झाला , म्हणजे त्याला ना धड मराठी येत नाही ना हिंदी नाही इंग्लिश, बार त्याचे आई वडील गवर्नमेंट शाळेमध्ये शिक्षक आहेत तरीपण त्याने आपल्या मुलाला इंग्लिश मिडीयम मध्ये टाकला, लहान मुलाला आपण जी घरात भाषा बोलतो त्याच भाषेच्या शाळेत टाका , तुम्ही जर मराठी आहात आणि घरात जर इंग्लिश बोलत आहात तर टाका ना त्याला इंग्लिश मिडीयम मध्ये. नाहीतर तुम्ही मराठी , शेजारी मराठी, आपला समाज मराठी, आणि पोराला टाकलाय इंग्लिश शाळेमध्ये (convent school ) अश्या प्रकारे त्याचा मेंदू confused होईल, म्हणजे ते बाळ गोंधळून जाईल, घरात वेगळी भाषा, शाळेत वेगळी भाषा , मित्र असे की त्यांना मराठी येत नाही,, मग तो बाळ गोंधळणार नाही तर काय करणार. 

सध्या तो बाळ घरात आता बोलते वेळी , मराठी बोलतो हिंदी बोलतो आणि इंग्लिश ही बोलतो , एका वाक्यात ती तिन्ही भाषा चा उपयोग करतो, कारण त्याचे आई बाबा मराठीत बोलतात, शाळेत मित्र हिंदी मध्ये बोलतात आणि टीचर इंग्लिश मध्ये, आणि त्याचा कानावर प्रत्येक भाषांचे थोडे थोडे शब्द पडत गेले , मग कोणता शब्द कोणत्या वाक्यात घुसवायचा हे त्याला कळत नाही,  आणि त्याला म्हणायला शब्द ही अपुरे पडतात, कारण तो न धड मराठी म्हणायला शिकला नाही हिंदी न इंग्लिश, म्हणून एका भाषेचे पूर्ण शब्द त्याचा मेंदूत उपलब्ध नाही, काही शब्द मराठीत उच्चार करतो, काही हिंदीतून आणि काही इंग्लिश मधून. 

तुम्हाला हे कितपत योग्य वाटतोय ते सांगा.

!!धन्यवाद!!

 








Comments